चाकणमध्ये विवाहीतेचा गळा चिरुन खून; पतीसह सासरकडच्या मंडळींना अटक

0
395

चाकण, दि. १७ (पीसीबी) – घरघुती वादातून सासरकडच्या मंडळींनी विवाहितेचा गळा चिरुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या आईने चाकण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना रविवारी (दि.१६) सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान खेड तालुक्यातील शिवे येथे घडली.