मतदान केले नाही, तर आपणच मूर्ख – परेश रावल

0
482

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – जनतेने मतदानासाठी घराबाहेर पडावे, जर आपण मतदान केले नाही आणि फक्त समस्यांचा पाढाच वाचत राहिलो,  तर आपणच मूर्ख ठरु, असे मत ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केले.  मी निष्ठावान आणि प्रामाणिक माणसाला मतदान केले, असे त्यांनी आज (सोमवार) मतदान केल्यानंतर सांगितले.

आज सकाळी परेश रावल आणि त्यांची पत्नी स्वरुप संपत यांनी विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.  यावेळी रावल म्हणाले की, जनतेने मतदानासाठी घराबाहेर पडावे, जर आपण मतदान केले नाही आणि फक्त समस्यांचा पाढाच वाचत राहिलो, तर आपणच मूर्ख ठरु, असे सांगून त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, रावल २०१४ मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. पण,  यंदा त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. यावरुन विरोधकांनी परेश रावल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून टीका केली होती. मात्र, यावर आज पत्रकारांनी प्रश्न विचारले असता  रावल यांनी उत्तर देण्यास नकार दिला.