चाकणमध्ये कुत्र्याला मारल्याच्या रागातून एकाला जबर मारहाण

0
518

चाकण, दि. १४ (पीसीबी) – दोन पाळीव कुत्र्यांची भांडणे सोडवण्यासाठी शेजारी राहणाऱ्या एकाने त्या दोघांना लहान काठीने मारले. यामुळे रागावलेल्या कुत्र्याच्या मालकाने कठीन वस्तूच्या सहाय्याने त्या इसमास जबर मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. १३) सकाळी सातच्या सुमारास शेलपिंपळगाव, मोहितेवाडी येथे घडली.

याप्रकरणी जखमी सुनील बबन मोहिते (वय ४३, रा. मोहितेवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खंडू विठ्ठल मोहिते (रा. मोहितेवाडी, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सुनील आणि आरोपी खंडू हे एकमेकांचे शेजारी आहेत. दोघांनीही कुत्रे पाळले आहेत. गुरुवारी सकाळी या दोघांच्या पाळीव कुत्र्यांची भांडण लागली.ही भांडण सोडवण्यासाठी सुनीलने दोन्ही कुत्र्यांना लहान काठीने मारले. सुनील यांनी आपल्या कुत्र्याला मारले या रागातून खंडू याने सुनील यांच्या डोक्यात कठीन वस्तूने मारले. तसेच छातीवर, हनुवटीवर आणि बरगडीवर मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.