चिखलीत लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघाभावांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण

0
452

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – ढाब्यावर जेवण केल्यानंतर लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघा भावांना चार जणांच्या टोळक्यांनी लाकडी दांडक्याने पायावर आणि छातीवर जबर मारहाण केली. ही घटना बुधवार (दि.१२) रात्री साडेदहाच्या सुमारास चिखली येथील साई प्रसाद ढाब्या शेजारी घडली.

याप्रकरणी अखिल हमिद पठाण (वय ३१, रा. गणेशनगर, तळवडे) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चिखली येथील साई प्रसाद ढाब्यात फिर्यादी अखिल आणि त्यांच्या भाऊ रिजवान या दोघांनी जेवण केले. जेवणकेल्यानंतर ढाब्या शेजारी असलेल्या जागेत ते लघुशंकेसाठी थांबले. यावेळी तेथे मंडपाचे साहित्य भरण्यासाठी आलेल्या चौघाजणांनी लाकडी दांडक्याने अखिल आणि त्यांचा भाऊ रिजवान या दोघांना जबर मारहाण केली. आणि पसार झाले. चिखली पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.