चाकणमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
693

चाकण, दि. ५ (पीसीबी) – अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका पादचाऱ्याचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कुरुळी गावाच्या हद्दीत चिंबळी फाटा येथे घडली.

भाऊसाहेब दत्तु भवर (वय ५०, रा. चिंबळी फाटा, मोशी) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अनिल गोरड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१९ एप्रिल) रात्री अकराच्या सुमारास भाऊसाहेब हे पायी कुरुळी गावाच्या हद्दीत चिंबळी फाटा येथून जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत भाऊसाहेब गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवार (दि.३० एप्रिल) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चाकण पोलीस आरोपी वाहनच चालकाचा शोध घेत आहेत.