चंद्रकांत पाटील शिवस्मारक भ्रष्टाचारात दोषी,आमच्याकडे पुरावे आहेत, त्यांना उघडं पाडू : नवाब मलिक

0
511

मुंबई,दि.१६(पीसीबी) – अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकावरून आता हिवाळी अधिवेशात राजकारण तापताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.शिवस्मारक बांधकाम निविदेमागे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वीच केला होता. आता कॅगच्या अहवालानंतर त्यावर शिक्कामोर्तब होत चाललं आहे. चंद्रकांत पाटील यामध्ये दोषी आहेत, त्यांनीच हे सर्व घडवून आणलं, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

कॅगनेच अहवाल दिल्याने चंद्रकांत पाटील आता नाकारु कत नाहीत. चंद्रकांत पाटील, पीडब्ल्यूडी विभाग यांनी भ्रष्टाचार केलाच आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. हा विषय आम्ही विधानसभेत लावून धरणार आणि याची चौकशी करुन, ज्यांनी ज्यांनी यामध्ये हात धुतले, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

सरकारला चौकशीच्या नावाखाली स्मारकाचे बांधकाम रेंगाळत ठेवायचे आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला. एवढेच नव्हे तर सरकारला या प्रकल्पाची चौकशी करायची असेल तर ती रेंगाळत न ठेवता तातडीने करा, असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिले.