भाजप माझ्या बापाचा पक्ष : पंकजा मुंडे

0
407

परळी ,दि.१२(पीसीबी) –  दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तानं भाजप नेत्या पंकजा मुंडे परळीतल्या ‘गोपीनाथ गडा’वर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

कोणी म्हणतं ही माझ्या बापाची जागा आहे, तसा भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे, असं सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपण बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा उडवून लावल्या. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे  यांनी समर्थकांशी संवाद साधत जोरदार भाषण केलं.

‘मी बंडखोर आहे’, अशी गर्जना करताना यापुढे आपण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीनं काम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. मुंबईत मुंडेंच्या नावानं कार्यालय सुरू करणार तसंच २७ जानेवारी रोजी औरंगाबादमध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. हे उपोषण कुणाच्याही विरोधात नाही, तर मराठवाड्यातील पाण्याच्या प्रश्नाकडे ठाकरे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी, ‘घाबरू नका… मुख्यमंत्री माझा भाऊच आहे’ असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही साद घातलीय.