घर खरेदी करताना महिलेची ‘अशी’ झाली तब्बल २५ लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

0
469

रहाटणी, दि. ११ (पीसीबी) – महिलेकडून २५ लाख रुपये घेऊन त्या रकमेतून दोघांनी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे फ्लॅट खरेदी केला. त्यानंतर महिलेचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली. ही घटना १ मार्च २०१९ ते १० ऑगस्ट २०२१ या कालावधीत रहाटणी येथे घडली. 

सुनंदा मछिंद्र साठे (रा. रहाटणी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनोज मुरलीधर जाधव, महेश मनोज जाधव (दोघे रा. रानमळा सातव नगर, कडूस, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज आणि महेश हे पिता-पुत्र आहेत. त्या दोघांनी फिर्यादी साठे यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. त्या रकमेतून आरोपींनी अंबरनाथ, जि. ठाणे येथे ६३५ चौरस फूट क्षेत्रफळ असलेला एक फ्लॅट खरेदी केला. फिर्यादी यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.