बेडरूम मधील सुटकेस मधून लाखोंचे दागिने चोरीला

0
229

मामुर्डी, दि. ११ (पीसीबी) – घराच्या बेडरूम मध्ये पोटमाळ्यावर ठेवलेल्या सुटकेस मधून अज्ञात चोरट्याने एक लाख ७९ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. ८) सकाळी थॉमस कॉलनी, मामुर्डी येथे उघडकीस आली.

रेखा दत्तात्रय कांबळे (वय ३५, रा. थॉमस कॉलनी, मामुर्डी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. १०) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांचे घर गुरुवार (दि. ५) सकाळी साडेनऊ ते रविवार (दि. ८) सकाळी सात या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या बेडरूमच्या मागील बाजूला असलेल्या खडकीचे गज कापून आत प्रवेश केला. आतील काचेच्या तावदानाचे लॉक तोडले. बेडरूम मधील पोटमाळ्यावर ठेवलेल्या सुटकेस मधून चोरट्यांनी एक लाख ७९ हजारांचे दागिने चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.