तरुणीला क्युआर कोड स्कॅन करायला लावून पावणे पाच लाखांचा गंडा

0
283

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – घरभाड्याचे पैसे आणि डिपॉझिट देण्याचे अमिश दाखवून क्यूआर कोड स्कॅन करायला लावून दोघांनी मिळून तरुणीच्या बँक खात्यातून चार लाख 78 हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले. ही घटना 2 जुलै 2021 रोजी काकडेनगर, चिंचवड येथे घडली.

ऋतुजा रामकृष्ण गिरी (वय 28, रा. काकडेनगर, चिंचवड) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 10) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रनदीप सिंग (मोबाईल क्रमांक ), झोरासिंग (मोबाईल क्रमांक ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून घरभाड्याचे पैसे व डिपॉझिट देतो असे सांगून त्यांना क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. आरोपीने तो आर्मीमध्ये असल्याचे सांगून सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे असे सांगून फिर्यादी यांच्या अकाउंटवरून चार लाख 78 हजार 9 रुपये ट्रान्स्फर केले. खात्यातून ट्रान्स्फर केलेले पैसे परत येतील असे आरोपींनी सांगितले. मात्र फिर्यादी यांच्या खात्यात पैसे आले नाहीत.

आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच फिर्यादी यांनी पिंपरी-चिंचवड सायबर शाखेकडे तक्रार केली. सायबर शाखेने चौकशी करून पुढील कारवाईसाठी गुन्हा नोंद करण्यास सांगितल्याने 10 ऑगस्ट रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.