घरफोडी करून दागिने, पैसे तर लांबवलेच पण त्याबरोबर चोरट्यांनी…..

0
298

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – एका चोरट्याने घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम यासह गॅस टाकी आणि घरगुती वापराचे साहित्य चोरून नेले. ही घटना गणेश नगर मोशी येथे घडली.

आदित्य तुकाराम वराट (रा. गणेशनगर, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत भिमराव श्रीराम वाढवे (वय 38, रा. भवानी पेठ, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 12) फिर्याद दिली आहे.

घरफोडीची ही घटना 15 नोव्हेंबर 2020 ते 17 जून 2021 या कालावधीत गणेशनगर, स्टार सेवन बेकरी शेजारी, मोशी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील कालावधीत फिर्यादी भिमराव वाढवे यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत आरोपी आदित्य याने कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच गॅस टाकी आणि इतर घरगुती वापराचे एकूण 36 हजार 100 रुपयांचे साहित्य चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.