घरकुल वसाहतीमधील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य; व्यवस्था कार्यक्षम करण्याची गरज

0
252

पिंपरी, दि.०४ (पीसीबी) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किसन शेवते यांनी “कचऱ्याची गाडी रस्त्यावर येऊन कचरा गोळा करते. मात्र सदर गाडी चार बिल्डिंगच्या आत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ मध्यभागी आली तर गृहिणींना संपूर्ण कचरा विलगीकरण करून गाडी मध्ये टाकता येईल,” अशी मागणी एका निवेदनाद्वारे ‘फ’ प्रभाग अधिकारी सीताराम बहुरे यांच्याकडे केली आहे.

त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “घरकुल वसाहतीतील कचरा रस्त्यावर पसरलाय. बेपर्वाईमुळे परिसर स्वछतेकडे दुर्लक्ष केेले जात आहे. त्यासाठी व्यवस्था कार्यक्षम करण्याची मागणी केली आहे. कारण, कचरा गोळा करण्यासाठी घरकुल वसाहतीमध्ये प्रत्येक इमारतीसमोर मनपाच्या आरोग्य विभागाने फुटपाथवर निळे डस्टबिन ठेवलेले असून ते डस्टबिन पूर्ण भरतात आणि भटकी कुत्री डस्टबिनमधील कचरा रस्त्यावर आणि सर्वत्र पसरवतात. रस्त्यावर पसरलेला कचरा वेळोवेळी उचललेला जात नाही. मनपाच्या संबंधित विभागाचे सुवरवायझर परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहेत. या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे परिसरात अनारोग्य आहे, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.