नमिश हूड, काव्या देशमुख यांना विजेतेपद

0
176
????????????????????????????????????

पुणे, दि. ४ (पीसीबी) – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पाचव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत मुलींच्या गटात काव्या देशमुख तर, मुलांच्या गटात नमिश हूड यांनी विजेतेपद मिळविले. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित काव्या देशमुख हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दुसऱ्या मानांकित ध्रुवा मानेचा 4-0, 4-1 असा पराभव केला. काव्या डीवाय पाटील शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून पीसीएमसी कोर्ट, आकुर्डी येथे प्रशिक्षक मनोज कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील या गटातील दुसरे विजेतेपद आहे.

मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात चौथ्या मानांकित नमिश हूड याने रोहन बजाजचा 4-1, 4-1 असा सहज पराभव केला. नमिश हा डिएव्ही पब्लिक शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून आरएनडी कॉलनीमध्ये प्रशिक्षक अविनाश हूड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी सनी मानकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गव्हाणे आणि रोहित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा निरीक्षक अनुप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्य फेरी :मुले :

नमिश हूड(4) वि.वि.समिहन देशमुख(1) 7-1; रोहन बजाज पुढे चाल वि.वैष्णव रानवडे(5);

अंतिम फेरी : नमिश हूड(4) वि.वि.रोहन बजाज 4-1, 4-1;

मुली : उपांत्य फेरी :

काव्या देशमुख(1) वि.वि.माहिका रेगे 7-4; ध्रुवा माने(2) वि.वि.स्वरा जावळे(3) 7-4;

अंतिम फेरी : काव्या देशमुख(1) वि.वि.ध्रुवा माने(2) 4-0, 4-1.