ग्रुप अॅडमिनच ठरणार व्हॉट्स अॅप ग्रुपचा बिग बॉस!

0
949

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – व्हॉट्स अॅपवर अॅडमिनला सर्वाधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हॉट्स अॅपने नवे फिचर दाखल केले असून ग्रुपमध्ये पोस्ट करायचा अधिकार कुणाला असेल याचे नियंत्रण अॅडमिनला देण्यात आले आहे.  ग्रुप सेटिंग मधे सेंड मेसेजेस हा नवा पर्याय देण्यात आला आहे. पोस्ट करण्याचा अधिकार ठराविक सदस्यांना आहे फक्त अॅडमिनला आहे की सगळ्या सदस्यांना आहे याची निवड अॅडमिनला करता येणार आहे. या नव्या फ़ीचरमुळे अनेक त्रासांपासून सुटका होणार आहे. अनेकजण भलतेच मेसेज नको त्या ग्रुप मधे टाकतात जाहिरातबाजी करतात. तसेच अफवाही पसरवतात. या सगळ्यावर आता अॅडमिनला नियंत्रण ठेवता येणार आहे यामुळे एखाद्या त्रासदायक सदस्याला ग्रुपमधून न काढताही गप्प करण्याचे अधिकार अॅडमिनला मिळाले आहेत.

व्हॉट्स अॅपतर्फे  ‘Only Admins’ हे सेटिंग आणले जाणार आहे. ज्यामध्ये ग्रुप अॅडमिन स्वतःच मेसेज टाकायचे, कोणी मेसेज पोस्ट करायचे याचा निर्णय घेऊ शकणार आहे. त्यासाठी अॅडमिनला ओन्ली अॅडमिन हे सेटिंग सिलेक्ट करावे लागणार आहे. व्हॉट्स अॅपच्या प्रवक्त्याने एका वृत्तवाहिनीला या संदर्भातली माहिती दिली आहे. या नव्या सेटिंगमुळे व्हॉट्स अॅपवर येणाऱ्या मेसेजेसवर अॅडमिनचे नियंत्रण राहणार आहे.