गुगल कंपनीमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची ‘अशी’ केली लाखोंची फसवणूक

0
275

काळेवाडी, दि. ७ (पीसीबी) – तरुणाला गुगल कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाचा आणि त्याच्या वडिलांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नोकरी लावण्यासाठी दोन लाख 43 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन तरुणाला नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. ही घटना एक जून ते सहा जुलै या कालावधीत काळेवाडी येथे घडली.

प्रग्नेश महेशभाई लिंबासीया (वय 30, रा. काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रिन्स रोनक वेनीलाल कोटेचा (रा. डांगे चौक, वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांना गुगल कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्याबाबत फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांचा आरोपीने विश्वास संपादन केला. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून आरोपीने वेळोवेळी 2 लाख 43 हजार 211 रुपये घेतले. पैसे घेऊन आरोपीने नोकरी न लावता फिर्यादी यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.