सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लाऊन फिरतील; निलेश राणेंचा शिवसेनेला टोला

0
809

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लाऊन फिरतील, असा टोला स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार  नीलेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. निवडणूक रणनीतीकार आणि संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावर राणे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

या भेटीच्या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि प्रशांत किशोर यांचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, आणि ते राजीनामे पण फाडून टाकायला सांगा, सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील सुद्धा.’ असे म्हटले आहे.

तर नीलेश राणे यांनी आणखी एका ट्विट करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधी यांनी किमान वेतन देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र किमान वेतन म्हणजे नेमके काय, असा खोचक सवाल राणे यांनी  काँग्रेसला केला आहे.