‘गाडी साईड का घेतली नाही’ असे म्हणत दोन भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण

0
271

चिखली, दि. २० (पीसीबी) – दुचाकीवरून दोन भाऊ जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून एका टेम्पो आला. टेम्पो चालकाने ‘गाडी साईड का घेतली नाही’ असे म्हणून शिवीगाळ केली. याचा दुचाकीस्वार भावांनी जाब विचारला असता टेम्पो चालकाने त्याच्या तीन साथिदारांना बोलावून घेत दोघा भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना (शुक्रवारी दि. १८) रात्री सव्वानऊ वाजता कुदळवाडी, चिखली येथील गुप्ता वजनकाट्यासमोर घडली.

अक्षय सुनील सोनवणे (वय ३०, रा. औंध रोड, पुणे), कुणाल सोनवणे अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा भाऊ कुदळवाडी येथील गुप्ता वजनकाट्यासमोरील रस्त्याने दुचाकीवरून जात होते. त्यावेळी एम एच १४ / सी पी ०५९१ हा टेम्पो आलं. टेम्पो चालकाने ‘गाडी साईडला का घेतली नाही’ असे म्हणून अक्षय यांना शिवीगाळ केली. अक्षय यांनी टेम्पो चालकाला शिवी का देता असे म्हटले.

त्यावरून टेम्पो चालकाने त्यांच्या तीन मित्रांना फोन करून बोलावून घेतले. आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ कुणाल याला धक्का देऊन खाली पाडले. त्याला उचलण्यासाठी अक्षय गेले असता आरोपींनी अक्षय यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. आरोपींना अडविण्यासाठी कुणाल आला असता आरोपींनी त्याला देखील मारहाण केली आणि पळून गेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.