कंपनीतील ट्रान्सपोर्टच्या गाड्या बंद केल्याने चक्क मॅनेजरचे दात पाडले

0
482

चाकण, दि. २० (पीसीबी) – कंपनीने ट्रान्सपोर्टच्या गाड्या बंद केल्या. त्यावरून दोघेजण बेकायदेशीरपणे कंपनीत आले. त्यांनी कंपनीच्या मॅनेजरसह दोघांना बेदम मारहाण केली. या भांडणात आरोपींनी मॅनेजरचे दात पाडले. ही घटना नाणेकरवाडी येथील युजीसी सप्लाय चेन सोल्युशन प्रा. ली. या कंपनीत शनिवारी (दि. १९) सकाळी घडली.

पांडुरंग गावडे (रा. वाकड), महेश शिंदे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मारुती अनंता गभाले (वय ४८, रा. आकुर्डी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गभाले नाणेकरवाडी येथील युजीसी सप्लाय चेन सोल्युशन प्रा. ली. या कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीत ट्रान्सपोर्टच्या कामासाठी आरोपींच्या गाड्या लावलेल्या होत्या. काही कारणास्तव कंपनीने गाड्या बंद केल्या. त्या कारणावरून दोन्ही आरोपी शनिवारी सकाळी अकरा वाजता कंपनीत अनाधिकाराने आले. ‘तुम्ही माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या का बंद केल्या’ असे म्हणून फिर्यादी गभाले आणि त्यांच्या मॅनेजर वासुदेव पांडुरंग पवार यांना हाताने, बुक्क्याने ठोसे मारून जखमी केले. त्यामध्ये आरोपींनी कंपनीनेच मॅनेजर वासुदे पवार यांचा दात तोडला. त्यानंतर आरोपींनी बघून घेण्याची धमकी देत, तुम्हाला जिवंत ठेवत नाही, अशी धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.