गव्याचा आता माणगावात गवगवा; नववर्षाच्या पहाटे दिले दर्शन

0
400

हिंजवडी, दि.०१ (पीसीबी) : काहीदिवसांपूर्वी गवा हा पुण्यामध्ये पाहण्यात आला होता. मात्र त्याला पकडण्याच्या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला. मात्र आता पुणे बावधननंतर आयटी नगरीतील माणगावात गव्याचा प्रवेश झाल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. गव्याचे दर्शन नववर्षाच्या भल्या पहाटेच झाल्याने माण मधील नागरिक भयभीत झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाचलामाण गावातील राक्षे वस्तीवर मुळा नदीकडून गवा आल्याचे जयवंत राक्षे यांनी पाहिले. भल्या पहाटे ते मॉर्निंग वॉकला जात असताना ते फोटो घेण्यासाठी पुढे आले असता गवा त्यांच्या अंगावर धावून आला त्यांनी तत्काळ पळ काढून घरात गेले. एवढ्यात घरातील अन्य मंडळी बाहेर आली असता तो गवा पांडुरंग राक्षे यांच्या बैलजोडी शेजारी उभा असल्याचे सर्वानी पाहिले. सर्वांना पाहताच अंधारात त्याने नदीच्या दिशेने धूम ठोकली असल्याची माहिती पांडुरंग राक्षे यांनी यावेळी दिली.

गाव पाहिल्याची चर्चा सगळीकडे पसरली असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तो ठाकर वस्ती किंवा मारणे वस्तीच्या दिशेने गेला असल्याचे लोकांनी पाहिल्याने तो शेतातील उसात लपून बसला आहे की काय या भीतीने माणवासीय मोठ्या चिंतेत आहेत.