गणेशोत्सव मंडळांची सहमती असेल, तर खुशाल डीजे वाजवा – राज ठाकरे

0
776

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – गणेशोत्सव मंडळांची सहमती असेल, तर खुशाल डीजे वाजवा, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) व्यक्त केले आहे.  मुंबई, ठाणे, नाशिकमधील डीजे मालकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली.  

डीजे बंदीचे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे पुढची सुनावणी होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा, मात्र मंडळ जर तयार असतील. तर डीजे वाजवा, असे राज ठाकरे यांनी डीजे मालकांना यावेळी सांगितले. तर ऐन सणासुदीच्या काळात ही बंदी घातल्याने आमच्यावर उपसमारीची वेळ आली आहे. त्यामुळे यावर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी डीजे मालकांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात डीजेसंदर्भात १४ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास तूर्तास परवानगी नाहीच. मात्र, साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणे कितपत योग्य?, असा सवाल न्यायालयाने    राज्य सरकारला केला आहे. याबाबत पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला होणार आहे.