खासदार उदयनराजेंची शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ; अमोल कोल्हेंनी केला खुलासा

0
706

कराड, दि. २९ (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मोठा विश्वास आहे. शरद पवार यांचे त्यांच्यावर प्रेम असून उदयनराजे भोसले यांनाही पवार यांच्याबद्दल आदर आहे.  सध्या पक्ष संकट काळातून जात आहे. अशा वेळी उदयनराजे  पक्षासोबत राहतील, असा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवस्वराज्य यात्रा साताऱ्यात आली. पण या यात्रेकडे उद्यनराजे यांनी पाठ फिरवली. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली होती. यावर खासदार  कोल्हे यांनी  खुलासा  केला आहे.

कोल्हे म्हणाले की,  सातारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती आली  होती.   माझे आणि खासदार उद्यनराजे  यांच्याशी बोलणे झाले  आहे. राजे पुण्यात असल्याने शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होऊ शकलेले नाहीत, असे  कोल्हे यांनी सांगितले.