‘जर राणे भाजपात आले तर आमचं ठरले’

0
1306

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जर राणेंचा भाजपा प्रवेश झाला, तर कोणता झेंडा हाती घ्यायचा? असा प्रश्न या पदाधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखीलराणेंना त्यांचा पक्ष भाजपामध्ये विलीन करायचा आहेअसे वक्तव्य केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनीजर राणे भाजपात आले तर आमचे ठरले’, असे सांगतआम्ही शिवसेनेत जाऊअसे खासगीत बोलताना सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी देखील शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, ‘राणेंना भाजपामध्ये घेऊ नकाअशी विनंती निवेदनातून करणार आहेत. तसेचजे स्वतःच्या पक्षाचे होऊ शकले नाहीत ते भाजपाचे काय होणार?’ असे देखील या निवेदनातून भाजपा पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत.

याआधी देखील राणेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेवेळी या पदाधिकाऱ्यांनीराणेंना भाजपामध्ये घेऊ नका’, असे सांगत राणेंचा पक्ष प्रवेश थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता देखील राणेंना भाजपामध्ये घेण्यासाठी हे पदाधिकारी मोर्चे बांधणी करत आहेत.