खासदार आणि आमदारांना वकिली करण्यापासून रोखता येत नाही – सर्वोच्च न्यायालय

0
305

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) –  खासदार आणि आमदारांना वकील म्हणून न्यायालयात प्रॅक्टिस करता येईल. कारण राजकीय नेत्यांना वकिली करण्यास प्रतिबंध करणारा बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून  कोणताही नियम करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना वकिली करण्यापासून रोखता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.