खाजगी व्हिडीओ असल्याचे सांगत तरुणीकडे शारीरिक संबंधाची मागणी

0
307

चाकण, दि. २६ (पीसीबी) – मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या तरुणीचा खाजगी व्हीडीओ आपल्याकडे असल्याचे सांगत एका तरुणाने संबंधित तरुणीकडे भेटण्याची तसेच शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. याबाबत तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी जाधव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पिडीत तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 25) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिडीत तरुणी तिच्या मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. तिने तिचा आणि तिच्या मित्राचा खाजगी व्हिडीओ बनवला आहे. तो व्हिडीओ तिच्याकडून कुठेतरी सेंड झाला असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरोपी बालाजी याने 29 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2020 या कालावधीत तरुणीशी मोबईलवर संपर्क केला. ‘तुझा व तुझ्या मित्राचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. तू मला भेटायला लातूरला ये. अथवा मी तुला भेटायला पुण्याला येतो. त्यावेळी मी तुला व्हिडीओ दाखवीन. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव’ अशी आरोपीने मागणी केली. 2 ऑक्टोबर रोजी आरोपीने अश्लील कृत्य करून फिर्यादी तरुणीचा वारंवार फोन करून पाठलाग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.