पिंपरी-चिंचवड शहरातून 6 लाखांची नऊ वाहने चोरीला; दुचाकी, तीनचाकीसह कारचाही समावेश

0
281

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी 6 लाख 4 हजार 500 रुपये किमतीची तब्बल नऊ वाहने चोरून नेली. यामध्ये सात दुचाकी, एक तीनचाकी रिक्षा आणि एका कारचा समावेश आहे. याबाबत शनिवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणात भास्कर शिवाजी म्हसाडे (वय 34, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. म्हसाडे यांची 3 लाख 19 हजार 500 रुपये किमतीची स्विफ्ट कार (एम एच 14 / ई पी 9657) त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. ही घटना 23 ऑक्टोबर रात्री साडेसात ते 24 ऑक्टोबर सकाळी साडेनऊ या कालावधीत घडली.

दुस-या प्रकरणात भूषण संज पाटील (वय 25, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून पाटील यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 15 / सी ई 7896) त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे. तिस-या प्रकरणात गणेश शरद चौधरी (वय 30, रा. घरकुल चिखली) यांनी फिर्याद दिली असून त्याची देखील 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ई एल 3016) घरासमोरून चोरून नेली आहे.

चौथ्या प्रकरणात मोहम्मद इस्त्रारार चौधरी (वय 42, रा. बालघरे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / बी पी 8833) अज्ञात चोरट्यांनी कुदळवाडी येथील जायका हॉटेलसमोरून चोरून नेली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

शुभांगी महेंद्र भालेराव (वय 46, रा. कामोठे, नवी मुंबई) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भालेराव यांची 50 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 10 / ई क्यू 2548) हुतात्मा चौक, प्राधिकरण निगडी येथून चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

सांगवी पोलीस ठाण्यात 95 हजारांचा तीनचाकी रिक्षा (एम एच 14 / एच एम 4338) चोरून नेल्याबाबत बबिता प्रकाश घोडके (वय 44, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या सोसायटी मधून अज्ञात चोरट्यांनी लॉक करून पार्क केलेला रिक्षा चोरून नेला आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विश्वास बबन वाघोले (वय 30, रा. दारूम्ब्रे गाव, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. वाघोले यांची 40 हजारांची दुचाकी (एम एच 12 / पी आर 9254) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या शेड समोरून चोरून नेली.

हिंजवडी पोलीस ठाण्यात शिवाजी महादेव दगडे (वय 45, रा. बावधन बु. ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. दगडे यांची 30 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 12 / एल एक्स 6905) अज्ञात चोरट्यांनी बावधन येथील बाळतुका इस्टेट समोरून चोरून नेली.

चाकण पोलीस ठाण्यात राजेशकुमार भगुलाल विश्वकर्मा (वय 49, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. विश्वकर्मा यांची 10 हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी ए 6395) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून हॅंडलचे लॉक तोडून चोरून नेली.