खळबळ : लक्झरी बस अडवून व्यापाऱ्याकडून ५० लाख रूपयांची रोकड लंपास

0
497

अकोला,दि.1(पीसीबी) -अकोला येथून मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला अडवून तिन दरोडेखोरांनी 50 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा नजीक असलेल्या एका धाब्यावर काल गुरुवार रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे . या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली. असून पोलीस प्रशासन चांगलेच हादरले आहे या प्रकरणात आरोपींचा शोध सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार अकोला काल सायंकाळच्या सुमारास अकोला येथून मुंबईला जाण्यासाठी लक्झरी बस अकोला लक्झरी बस स्थानकावरून मार्गस्थ झाली. दरम्यान रिधोरा परिसरात असलेल्या एका धाब्याच्या परिसरात सदर बस तीन दरोडेखोरांनी अडवली त्यामध्ये अकोल्यातील व्यापारी बसले होते . सदर व्यापारी मुंबई येथे 50 लाख रुपयांची रोकड घेऊन मुंबईला जात होते.

व्यापाराच्या मार्गावर असलेल्या तीन आरोपींनी पाळत ठेवून लक्झरी रिधोरा मार्गावरील स्पीड ब्रेकर जवळील ढाब्याजवळ अडविली. दरम्यान बळजबरीने व्यापारी यांच्याकडून 50 लाख रुपयांची रोकड हिसकावून घेतली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. या प्रकरणात वृत्त लिही पर्यंत कुठलीही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र पोलिसांकडून काल रात्रभर तपास सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध लावणे सुरू आहे .