खराळवाडीतील गुलाबराव चांदेरे यांचे निधन

0
931

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – महाराष्ट्र ज्येष्ठ नागरीक महासंघ (फेस्कॉम) पुणे विभागाचे पदाधिकारी व पिंपरी, खराळवाडी येथील रहिवासी गुलाबराव मारुती चांदेरे (वय ७४) यांचे वृध्दापकाळाने शुक्रवारी (दि. ३० नोव्हेंबर) निधन झाले. नेहरूनगर येथील स्मशानभूमीत शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते पै. संतोष चांदेरे यांचे ते वडील होत.