खंडणीचा गुन्हा दाखल केलेले दोन पोलीस निलंबित; पोलीस आयुक्तांची कारवाई   

0
662

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरण्याच्या संशयावरून एका तरूणाला अटक करून   बेदम मारहण करत  विजेचा शॉक देऊन त्याच्याकडून ८ लाख रूपये उकळणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या सहकाऱ्यावर आज (शनिवार) पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या दोघांवर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

रमेश नाळे आणि हेड कॉन्स्टेबल राजू केदारी असे निलंबित केलेल्या गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचारी आहेत. याना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश नाळे आणि राजू केदारी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी (दि.३०) दिले होते. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.