कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन; हृदयविकाराच्या धक्क्याने प्राणज्योत मालवली

0
406

कोल्हापूर, दि.०२ (पीसीबी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळांशी फुटबॉलच्या माध्यमातून त्यांचा थेट संपर्क होता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव कामान त्यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला होता.

कोण होते चंद्रकांत जाधव??

यशस्वी उद्योजक म्हणून चंद्रकांत जाधव यांची महाराष्ट्रभर ओळख होती. 2019 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही जाधव यांचे घनिष्ठ संबंध होते. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी कोल्हापूर महानगर पालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या.

गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमध्ये चंद्रकांत जाधव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हार्ट अटॅकमुळे त्यांचे निधन झाले. दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणले जाणार असल्याची माहिती जाधव यांच्या निकटवर्तीयांनी दिली. चंद्रकांत जाधव यांच्या अचानक एक्झिटने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.