कोल्हापूरात ऊसदर आंदोलनाची ठिणगी, आंदोलनाला ‘हिंसक’ वळण

0
586

कोल्हापूर,दि.२१ (पीसीबी)-  कोल्हापुरातील शिरोळ आणि हातकंणगले तालुक्यात ऊस दराचे आंदोलन चिघळले असून त्याला हिंसक वळण लागले आहे. कर्नाटकामधील कारखान्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते आणि दानोळी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकमध्ये ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टरना लक्ष करत ट्रॅक्टर पेटवून दिला .

२३ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार आहे. या ऊस परिषदेमध्ये उसाचा दर किती मिळाला पाहिजे याबाबत भूमिका जाहीर केली जाणार आहे .

जो पर्यंत ऊस परिषदेमध्ये ऊस दराची भूमिका जाहीर केली जात नाही. तोपर्यंत उसाची तोड घेऊ नये अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका असते. कोणी उसाचा दर जाहीर न करताच उसाची तोड घेतली तर स्वाभिमानीचे कार्यकर्ते उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रकला लक्ष करतात. यंदाच्या हंगामात उसाचं कमी झालेले क्षेत्र आणि महापुरामुळे उसाचा झालेलं नुकसान यामुळे साखर कारखानदार उसाची पळवापळवी सुरू केली आहे.