‘हम बुरे ही ठीक हैं’,ट्विटरवरून संजय राऊतांचा पुन्हा एकदा भाजपावर निशाणा

0
403

मुंबई,दि.२१ (पीसीबी)- सत्ता स्थापनेच्या हालचाली वर शिवसेना खासदार संजय राऊत रोज सूचक ट्विट करत असता. कविता शायरी पोस्ट करण्याचा त्यांचा धडाका सुरूच आहे.मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे ते सतत सांगत आहेत. यासोबतच ट्विटरच्या माध्यमातून ते अप्रत्यक्षपणे रोज भाजपला टोला लगावत असतात. त्यांची ट्विटची मालिका सुरूच आहे . त्यामुळे त्यांनी आज केलेल ट्विटही लक्षवेधी ठरले आहे.

दरम्यान राज्यात महाराशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दररोज बैठकांमागून बैठका, पत्रकार परिषदा होऊनही सत्तास्थापनेचा तिढा सुटता – सुटत  नाही आहे .