कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराची निकालाआधीच मिरवणूक

0
649

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी  मतदान झाल्यानंतर  आता सर्व उमेदवारांचे लक्ष मतमोजणीच्या  २४ तारीखकडे लागून राहिले आहे.  तर, दुसरीकडे कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून सोमवारी (दि.२१) आनंद साजरा केला. 

कोल्हापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांचा शिवसेनेच्या संजय घाटगे यांच्याशी चुरशीची लढत झाली.  मात्र,  मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी  उत्साहाच्या भरात मतदान पार पडल्यानंतर लगेचच मुश्रीफांची विजयी मिरवणूक काढली. मुश्रीफ यांनी गुलाल उधळत आनंद साजरा करत खास उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलने कॉलरही उडवली.

रत्नागिरीतील दापोलीत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांनीही निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढली. विशेष बाब म्हणजे संजय कदमांनी आतापर्यंत लढलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये निकालापूर्वीच विजय साजरा केला आहे. संजय कदम यांच्याविरुद्ध शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांचे तगडे आव्हान उभे केले होते.