नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

0
520

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी)-   नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट खूच छान झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. “आमच्यामध्ये विविध विषयांवर निरोगी आणि व्यापक संवाद झाला. भारताला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.” असे मोदींनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

मोदी म्हणाले, “नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याशी चांगली भेट झाली. त्यांच्याशी बोलताना मानवी सक्षमीकरणाबद्दलची त्यांची आवड स्पष्टपणे दिसून येते. आमच्यात निरनिराळ्या विषयांवर निरोगी आणि व्यापक संवाद झाला. भारताला त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान असून त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.”

नोबेल सारखा जागतिक सन्मान मिळाल्यानंतर अभिजीत बॅनर्जी पहिल्यांदाच भारत भेटीवर आले आहेत. दरम्यान, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर ते कोलकात्यात जाऊन आपल्या आईची भेट घेणार आहेत, तसेच दोन दिवस कोलकात्यात घालवणार आहेत.