कोरोना अपडेट: आजवर जगभरात तब्बल ‘एवढे’ लाख लोकांचे कोरोनामुळे झाले मृत्यू

0
259

मुंबई, दि . २९ (पीसीबी) – कोरोनामुळे संपूर्ण जगभरात १९ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेते आपातकालीन प्रमुख मायकल रायन यांनी कोरोना संकट हे फार मोठं नव्हतं मात्र सर्वांना खडबडून जागं करणारी परिस्थती होती असं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मायकल रायन यांनी हा सर्वांना भविष्यात येऊ शकणाऱ्या संकटाचं गांभीर्य दर्शवणारा इशारा होता असं म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “कोरोनाचा संसर्ग जगभरात अत्यंत वेगाने पसरला होता. पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी करोनाचा फटका बसला आहे. पण हे संकट सर्वात मोठं आहे म्हणण्याची गरज नाही”. कोरोना संकटामुळे अनेक बलाढ्य देशांसमोर संकट निर्माण झालं होतं. अमेरिकासारख्या देशालाही कोरोना संकटाचा मोठा फटका बसला असून अर्थव्यवस्थेचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. अजूनही कोरोना संकट टळलेलं नसून अनेक देश याचा सामना करत आहेत.

पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी; ब्रिटनहून आलेले १०९ प्रवासी सापडेनात
मायकल रायन यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं की, “हा संसर्ग फार धोकादायक आहे. जगभरात अत्यंत वेगाने याचा फैलाव झाला आणि पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी यामुळे संकट निर्माण झालं. पण हे सर्वात मोठं संकट आहे म्हणण्याची गरज नाही. संसर्गजन्य असलेल्या या आजारामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. परंतु इतर नव्याने येणाऱ्या आजारांच्या तुलनेत सध्याची मृत्यूची संख्या कमी आहे. ही आपल्या सर्वांना जागं करणारी परिस्थिती आहे”.