मुंबईतील धक्कादायक, रानटी, किळसवाणी घटना…

0
217

मुंबई, दि.२९ (पीसीबी) – मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या बापाने १४ वर्षाच्या पोटच्या मुलीलाच वासनेचा बळी बनवलं. मुलगी आजोळी गेल्यानंतर ही बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. मुलीने आपल्या आईला झालेला प्रकार सांगितल्यानंतर आईने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर उज्जैन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बापाकडून १२ जूनपासून सातत्यानं बलात्कार करण्यात आल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.

आरोपी मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनी मोठ्या पदावर कामाला असून, १२ जून रोजी आरोपीनं मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर सातत्यानं लैंगिक शोषण केलं. बापाकडून सातत्यानं लैंगिक शोषण होत असतानाच पीडिता काही दिवसांसाठी आपल्या आजोळी गेली होती. तिथे काही दिवस राहिल्यानंतर तिने पुन्हा मुंबईत येण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या आईने विचारणा केली. त्यानंतर पीडितेनं बापाकडूनच होत असलेल्या अत्याचाराची भयंकर गोष्ट आईला सांगितली.

अल्पवयीन पीडितेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी जेव्हा तिची आई आजारी होती, तेव्हा वडील तिच्या बेडरुममध्ये आले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने अनेकवेळा मुलीवर अत्याचार केले. जेव्हा मुलीने अत्याचाराला विरोध केला. तेव्हा आरोपीनं तिला बहुमजली इमारतीत उंचावर असलेल्या त्यांच्या घरातून खाली फेकण्याची धमकी दिली होती, असं पीडितेनं म्हटलं आहे.