‘कोरोनामुळे गणेशोत्सव मंडळांना मंडप भाडे, पालिका भाडे, परवानगी शुल्क माफ करा’

0
276

– शिवसेना शाखाप्रमुख प्रविण धोंडाप्पा पाटील यांची आयुक्तांकडे मागणी 

पिंपरी दि.१० (पीसीबी) – कोरोना मुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर आर्थिक संकट ओढावलेले आहे,तसेच वर्गणी,देणग्याचा ओघ आटला आहे. तरीही उत्सव साजरा करण्याचा निर्धार गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात आला आहे.गणेशोत्सवाची परंपरा अखंडित सुरू रहावी यासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप भाडे,पालिका भाडे,परवानगी शुल्क माफ करण्याची मागणीचे निवेदन शिवसेना शाखाप्रमुख प्रविण धोंडाप्पा पाटील यांनी आयुक्तांना दिले.

यासंदर्भात पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की पिंपरी-चिंचवड शहरात छोटी-मोठी हजारो गणेशोत्सव मंडळे महानगरपालिकेच्या मैदानात,रस्त्यावर व इतरञ ठिकाणी परवानगी घेऊन मंडपाचे भाडे भरून उत्सव साजरा करतात.माञ यंदा कोरोनाच्या आर्थिक संकटामुळे परवानगी शुल्क,मनपा जागेचे भाडे माफ करावे व मंडळांना उत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे,अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली असून

यासंबंधी आयुक्तांनी भूमी व जिंदगी विभागाच्या पञाद्वारे याविषयी लवकरच मागणीकर्ते,मंडळाचे कार्यकर्ते,पोलिस यांच्याशी एकञित चर्चा करून समन्वयाने यावर निर्णय घेण्यात येईल असे कळवले आहे.