कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही – संजय दत्त  

0
462

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राजकारणात  येण्याचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा माझा अजिबात विचार नाही, असे स्पष्ट  करून राजकारण प्रवेशाच्या  वृत्ताचे प्रसिध्द अभिनेता संजय दत्त याने खंडन केले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मुंबईत पक्षाच्या कार्यक्रमात संजय दत्त  २५  सप्टेंबर रोजी रासपमध्ये प्रवेश करणार  असल्याचे जाहीर केले होते. यावर संजय दत्तने स्पष्टीकरण दिले आहे.

महादेव जानकर माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.  मात्र, कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही, असे  संजय दत्तने म्हटले आहे.

दरम्यान,  जानकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जानकर यांच्या वक्तव्याला  पुष्टी मिळाली होती.  त्यामुळेच  संजूबाबा ‘रासप’मध्ये जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली  होती.