कैलास पर्वताची ‘ही’ अशी रहस्य आहेत ज्याचे गूढ अजून शास्त्रज्ञांना सुद्धा उलगडले नाहीय…

0
606

कैलास मानसरोवर हे भगवान शंकरांच्या निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताजवळ आहे. हे स्थान आश्चर्यकारक आणि रहस्यमयतेने भरलेले आहे. शिवपुराण, स्कंद पुराण, मत्स्य पुराण इत्यादींचा ‘कैलास खंड’ नावानी वेगवेगळे अध्याय आहेत.

पौराणिक कथेनुसार कैलास पर्वत हे एक ‘कुबेर शहर’ आहे. येथूनच गंगा महाविष्णूच्या अंकुरातून बाहेर पडते आणि कैलास पर्वताच्या शिखरावर येते, जिथे भगवान शिव त्यांना आपल्या जटामधून पृथ्वीवर शुद्ध आणि पवित्र प्रवाह म्हणून प्रवाहित करतात. कैलास पर्वताच्या वर स्वर्गलोक आणि खाली मृत्यू लोक आहे. त्यामुळे या कैलास पर्वताबद्दल काही रहस्यमयी आश्चर्य आहेत ज्यांचे गूढ नासामधल्या वैज्ञानिकांना सुद्धा उलगडले नाही… चला तर जाणून घेऊयात काय आहेत कैलासपर्वता वरील रहस्ये….

१. पृथ्वीचे केंद्र
पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव आहे, तर दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव आहे. हिमालय हे दोघांच्या बरोबर मध्यभागी वसलेले आहे. आणि कैलास पर्वत या हिमालयाचे केंद्र आहे. शास्त्रज्ञांच्या मते हे पृथ्वीचे केंद्र आहे. कैलाश पर्वत हे जगातील मुख्य धर्म- म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख धर्म यांचे केंद्र आहे.

२. अलौकिक शक्तीचा वास
कैलास पर्वत हे असे केंद्र आहे ज्याला अ‍ॅक्सिस मुंडी असे म्हणतात. अ‍ॅक्सिस मुंडी म्हणजे जगाची नाभी. हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील जोडणीचे बिंदू आहे, जिथे दहा दिशानिर्देश एकत्र होतात. रशियन शास्त्रज्ञांच्या मते, अ‍ॅक्सिस मुंडी ही अशी जागा आहे जिथे अलौकिक शक्ती राहते आणि या शक्तींशी आपण संवाद सुद्धा साधू शकतो.

३. कैलास पर्वत चढणे अशक्य
कैलास पर्वत चढणे काही सोप्पे काम नाहीये. भल्याभल्यांना इथे थंडीत घाम फुटतो. परंतु ११ व्या शतकात ‘मिलारेपा’ नावाच्या एका तिबेटी बौद्ध योगिनीं हा पर्वत चढला होता असं म्हंटल जात. रशियन शास्त्रज्ञांनी हा अहवाल ‘यूएनस्पेशियल’ या मासिकाच्या जानेवारी 2004 च्या अंकात प्रसिद्ध केला होता. जेव्हा कि, मिलारेपाने मात्र याबद्दल अजूनही काहीही उलगडा केलेला नाहीये. म्हणून तेही एक रहस्यच आहे.

४. सर्व पवित्र नद्यांचा उगम
या पर्वतावर ४ दिशामधून ४ नद्यांचा उगम होतो. – ब्रह्मपुत्रा, सिंधु, सतलज आणि कर्नाली. या नद्यांमधुनचं गंगा, सरस्वतीसह चीनच्या इतर नद्यादेखील वाहतात. कैलासच्या चारी दिशांना वेगवेगळ्या प्राण्यांची मुख आहेत. पूर्वेकडे अश्वमुख, पश्चिमेला हत्ती, उत्तरेस सिंह तर दक्षिणेस मोराचे मुख आहे. आणि या मुखातूनच या नद्या उगम पावतात.

५. केवळ संतांचच वास्तव्य
कैलास पर्वतावर फक्त महान आणि पुण्यवान आत्मेच वास्तव्य करू शकतात. तेथील मंदिरांमध्ये असणारे धर्मगुरूं असं म्हणतात कि, कैलास पर्वताभोवती अनेक अलौकिक शक्तीचा प्रवाह आहे ज्यामध्ये संन्यासी लोक अजूनही धर्मगुरुंशी या अध्यात्मिक शक्तींच्या मदतीने संपर्क करतात.

६. यती मनुष्याचा वावर 
हिमालयात राहणारे लोक असं म्हणतात कि, हिमालयात ‘यतीमानव’ राहतात. काहीजण याला तपकिरी अस्वल, जंगली माणूस तर कोणी बर्फाचा माणूस म्हणतात. इथे असा विश्वास आहे की हा याती मानव लोकांना मारतो आणि खातो. हिमालयातील हिमाच्छादित भागात हिम मानवांचे अस्तित्व असल्याचा दावा जगभरातील 30 हून अधिक वैज्ञानिकांनी केला आहे.

७. आकाशात चमचमता प्रकाश
असा दावा केला जातो कि, कैलास पर्वतावर बर्‍याच वेळा आकाशात ७ प्रकारचे दिवे म्हणजेच प्रकाश चमकत असल्याचं पाहिलं गेलं आहे. मात्र नासाचे शास्त्रज्ञ असं म्हणतात कि, येथील चुंबकीय शक्तीमुळे हा प्रकाश चमकतो. कारण इथली चुंबकीय शक्ती आणि आकाश यांच्या एकत्रित येण्यामुळे असा प्रकाश तयार होतो.

८.ओम’ आणि डमरू चा ध्वनीनाद
जर तुम्ही कैलास पर्वत किंवा मानसरोवर तलावाच्या प्रदेशात गेलात तर तुम्हाला एकसारखा ध्वनी ऐकू येईल, जसकाही जवळपास कुठेतरी विमान उडतंय. पण लक्षपूर्वक ऐकल्यावर हा आवाज ‘डमरू’ किंवा ‘ॐ’ च्या आवाजासारखा असतो. याबद्दल शास्त्रज्ञ असं म्हणतात की हा कदाचित बर्फ वितळण्याचा आवाज असू शकतो, किव्वा प्रकाश आणि आवाज यांच्या एकत्रित येण्याने येथून ‘ॐ’ चा ध्वनी ऐकू येतो.हि आणि अशी अनेक रहस्य आहेत ज्या बद्दल अजूनही उलगडा झालेला नाहीये. या काही गोष्टीचे गूढ आजही कायम आहे..