विकास कामाच्या नावाखाली टक्केवारीचे राजकारण सुरू आहे; संथगती कामामुळे वाहतुकीची कोंडी होतेय – डॉ.सुरेश बेरी

0
611

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – म्हाळसाकांत चौकातील आकुर्डीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम गेली दीड वर्षे संथगतीने सुरू आहे. पूर्वीचा डांबरी रस्ता खोदून तेथे स्टॉर्म वाटर पाईपलाईन टाकण्यात आली.

नागरिकांची मागणी नसताना या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. शहरात खोदाई करून विकास कामाच्या नावाखाली टक्केवारीचे राजकारण सुरू असल्याची टीका, जेष्ठ कम्युनिस्ट नेते डॉ.सुरेश बेरी यांनी केली आहे.

आकुर्डी,निगडी,प्राधिकण,दत्तवाडी इ कामगार वस्तीत लोकांना मूलभूत सुविधा पुरेशा मिळत नाहीत. रस्त्याची खोदाई केल्यामुळे शहरात सर्वत्र धूळ आहे.त्यामुळे नागरिकांना सर्दी खोकल्याचे आजार वाढले आहेत. सिमेंटच्या रस्त्यामुळे घरामध्ये छोटे धोकादायक सूक्ष्म कण पसरतात. मनपाने महासुलचा उपयोग जनआरोग्य,पुरेसे पाणी पुरवठा व्यवस्थापन,स्वस्त शिक्षणा आणि गरिबांच्या घरकुल योजनेसाठी करावा. आकुर्डीतील म्हाळसकांत चौकातील रस्त्याचे काम नव्या वर्षात पूर्ण करावेत, असा सल्ला डॉ.सुरेश बेरी यांनी दिला आहे.