किसन वीर साखर कारखान्याच्या निकालात चमत्कार

0
389

वाई, दि. ६ (पीसीबी) : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलने माजी आमदार मदन भोसले यांच्या सत्ताधारी पॅनेलचा मोठा पराभव करीत सत्तांतर केले. तब्बल एकोणीस वर्षांनंतर हे सत्तांतर होत आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर झालेली नसली, तरी सातारचे दोन्ही राजे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सहकार्याची भूमिका आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलला पूरक ठरली.

कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेल आणि त्यांच्या विरोधी आमदार पाटील यांच्या किसन वीर कारखाना बचाव पॅनेलमध्ये ही निवडणूक झाली. यामध्ये सर्वच्या सर्व २१ जागा आमदार पाटील यांच्या पॅनेलने जिंकल्या. आज मतमोजणी सुरू झाल्यावर पहिल्या फेरीपासून कारखाना बचावचे सर्व उमेदवार आघाडीवर राहिले. सायंकाळपर्यंत निकाल स्पष्ट होत कारखान्यात १९ वर्षांनतर सत्तांतर घडले.
मदन भोसले यांनी कारखान्यात एकाच वेळी उभारलेले विविध प्रकल्प, त्यामुळे आलेल्या आर्थिक ताण आणि मागील सात-आठ वर्षांत कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्यात आलेल्या अडचणी, त्यामुळे ऊस उत्पादकांचे झालेले नुकसान, कारखान्याच्या कामगारांचे थकलेले पगार, मागील वर्षीची उसाची देय एफआरपी. तोडणीच्या प्रतीक्षेत उभा असलेला शेकडो एकरातील ऊस हे मुद्दे या निवडणुकीत कळीचे मुद्दा ठरले.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आमदार मकरंद पाटील सोसायटी मतदार संघ (२३८) अनुसूचित जाती जमाती -गट-संजय कांबळे ( २२७२४), भटक्या विमुक्त जाती जमाती-हणमंत चवरे ( २२६६६१),महिला राखीव- वीर सरला (२१५६१) जाधव सुशीला (२२३९४), इतर मागास वर्ग-शिवाजी जमदाडे (२२६१०), ऊस उत्पादक गट-कवठे खंडाळा-नितीन जाधव पाटील (२२२४४) रामदास गाढवे (२२१५५) किरण काळोखे (२१७१६), भुईंज -प्रमोद शिंदे (२१५०७) प्रकाश धरगुडे (२१६७९) रामदास इथापे (२१५६८), वाई बावधन जावली- दिलीप पिसाळ (२२३५९) शशिकांत पिसाळ (२२०५८) हिंदूराव तरडे (२१४६९), सातारा – संदीप चव्हाण (२२११०) सचिन जाधव (२३०३६)
बाबासाहेब कदम (२१८३३) ,कोरेगाव -ललित मुळीक (२१७६७) संजय फाळके (२१७७३) सचिन साळुंखे (२१५३२)