किरकोळ कारणावरून एकाला मारहाण; तरुणावर गुन्हा दाखल

0
458

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – माझ्या घराजवळ का थांबला, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 20) रात्री नेहरूनगर, येथे घडली. याबाबत मारहाण करणा-या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील दिलीप भापकर (वय 37, रा. क्रांतीचौक, नेहरूनगर, पिंपरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 21) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुपेश (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास आरोपी रुपेश हा फिर्यादी भापकर यांच्या घराजवळ उभा होता. यामुळे भापकर यांनी रुपेश याला येथे का थांबला आहे, अशी विचारणा केली. या कारणावरून संतापलेल्या आरोपीने फिर्यादी भापकर यांना दगडाने मारहाण करून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.