काळेवाडीत भांडणाचा जाब विचारला म्हणून टोळक्यांकडून पती-पत्नीस जबर मारहाण करुन घरातील साहित्याची तोडफोड

0
1319

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – भांडणाचा जाब विचारला म्हणून तिघा टोळक्यांनी पती-पत्नीस जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण करुन त्यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. इतकेच नाही तर टोळक्यांनी त्या दाम्पत्याच्या दुचाकीची देखील तोडफोड केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.४) रात्री साडेअकरा ते अडिचच्या दरम्यान पवनानगर गल्ली नंबर ३ आणि २ मजिदसमोर काळेवाडी येथे घडली.

शांताराम एकनाथ काळुळदे (वय ४५) आणि त्यांची पत्नी कल्पना (दोघे.रा. पवनानगर गल्ली नं.२, मजिद समोर) असे जखमी झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिपक नाना शेवरे, महेंद्र कोळी आणि राकेश या तिघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक शेवरे, महेंद्र कोळी आणि राकेश यांच्यासोबत फिर्यादी शांताराम काळुळदे यांचा किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणाचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काळुळदे हे आरोपींकडे गेले होते. यावर आरोपी महेंद्र कोळी याने फिर्यादीस, “मी गुन्हेगार आहे तुम्हाला खल्लासच करुन टाकतो” असे बोलून शांताराम यांच्या डोक्यात फायटरने मारुन जखमी केले. यावेळी शांताराम यांच्या पत्नी कल्पना भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता आरोपी राकेश आणि महेंद्र यांनी मिळून कल्पना यांना हाताने जबर मारहाण केली. तसेच रात्री अडीचच्या सुमारास काळुळदे यांच्या घरात घुसून घरातील साहित्य आणि दुचाकीची तोडफोड करुन फरार झाले. याप्रकरणी शांताराम यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार, तातडीने  दिपक नाना शेवरे, महेंद्र कोळी आणि राकेश या तिघा आरोपींना अटक केली. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.