शिवस्मारकाची उंची वाढवण्याबाबत पुनर्विचार करू – विनायक मेटे  

0
845

जालना, दि. ६ (पीसीबी) – छत्रपती शिवरायांचा पुतळा जगातील सर्वाधिक उंचीचा असावा, अशी भावना  राज्यभरातील शिवप्रेमींची  आहे. त्यामुळे अयोध्येत श्रीरामांचा पुतळा २२१ मीटरचा होत असल्यास शिवस्मारकाची उंची आणखी वाढवण्याबाबत पुन्हा पुनर्विचार  करण्यात येईल, असे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटले आहे. 

जालन्यामध्ये शिवसंग्रामच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना मेटेंनी शिवस्मारकाच्या उंची वाढवण्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. अरबी समुद्रात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २१० मीटर उंचीचा आहे. तर अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर प्रभू श्री रामाचा २२१ फूट उंची असलेला पुतळा उभारण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशात प्रभू श्रीरामाची २२१ मीटरची भव्य मूर्ती उभारली जाणार आहे, याबाबतची बातमी मी वृत्तपत्रात    वाचली आहे.  ही बातमी खरी असेल, तर अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची वाढवण्याबाबत पुर्नविचार केला जाईल. तसेच उंची वाढवण्याची मागणी सरकारकडे करण्यात येईल, असे विनायक मेटे  यांनी सांगितले.