काळेवाडीत गोदामाला आग लागून ५ लाखांचे प्लायवुड जळून खाक

0
579

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – प्लायवुडच्या गोदामाला लागलेल्या आगीत ५ लाखांचे प्लायवुड जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी (दि. १८) रात्री साडे अकराच्या सुमारास काळेवाडी येथील विजयनगरातील किनारा कॉलनी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, किनारा कॉलनी येथे दिनेश मोटवानी यांच्या प्लायवुडच्या गोदामाला आगा लागली. या गोदामाच्या बाजूला असलेल्या दोन खोल्यांमध्ये कडबा ठेवण्यात आला होता. या कडब्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण करत शेजारी असलेल्या प्लायवुडच्या गोदामाला पेट घेतली. यात पाच लाखांचे प्लायवुड जळून खाक झाले.

या घटनेनंतर रहाटणी, तळवडे, वल्लभनगर, पिंपरी, येथील अग्निशमक दलाचे बंब दाखल झाले. सुमारे तीन तासांच्या शर्थींच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.