काळाखडक येथील तडीपार गुन्हेगाराला थेरगावमधून अटक

0
554

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस पथकाने थेरगाव येथून अटक केली आहे.

संदीप उर्फ बाळू शांताराम भोसले (वय २५, रा. काळाखडक, झोपडपट्टी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक रेकॉर्ड वरिल आणि फरार आरोपींच्या शोधात गस्त घालत असताना पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाली की, पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार संदीप उर्फ बाळू भोसले हा थेरगाव येथील अशोका सोसायटीत येणार आहे. संदीप याला परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्तांनी २२ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्यामुळे पोलिसांनी थेरगाव परिसरात सापळा लावला. संदीप अशोका सोसायटी येथे आला असता पोलिसांनी त्याला अटक केले. तसेच पुढील कारवाईसाठी त्याला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.