इयत्ता पहिली, दुसरीच्या मुलांना गृहपाठ देऊ नका; मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा आदेश

0
654

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – इयत्ता पहिली आणि दुसरीतील मुलांच्या तणावमुक्त आणि आनंददायी शिक्षणासाठी  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एका मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिली, दुसरीच्या मुलांना शिक्षकांनी गृहपाठ देऊ नये, असे आदेश दिले आहेत.  याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने राज्यांना परिपत्रक पाठवले आहे. तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबतही सुचना दिल्या आहेत. यामुळे मुलांची तणावपूर्वक अभ्यासातून सुटका होणार आहे.