कामगारांवर अन्याय होता कामा नये – अजित गव्हाणे

0
231

पिंपरी, दि. २(पीसीबी) – पिंपरी चिंचवड़ शहराचे रूपांतर अण्णासाहेब मगर यांच्या कल्पकतेतुन ओद्योगिक नगरी मध्ये झाले. येथे उद्योग धंदे वाढविन्याचे कार्य शरद पवार यानी केले, तर महापालिकेला आजितदादा यानी उंचावर नेत या शहराला नव्याने ओळख करून दिली व वैभव प्राप्त करून दिले. त्यामुळे येथे रोजगार , उद्योग व्यावसाय निर्माण झाले कामगारांवर अन्याय होता कामा नये , जर कुणावर अन्याय होत असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकरत्याशी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देवू असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले

इखलास सय्यद है राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय मार्फत चांगले काम करीत आहेत
आज त्यांनी कष्टकारी कामगारांच्या सन्मान केला ही बाब उल्लेखनीय आहे
कामगरानी व नागरिकांनी त्यांच्या अडचणी सोडविन्या साठी इखलास सय्यद यांच्याशी संपर्क साधावा. गेले दोन दशके आकुर्डी भागात पक्षाचे काम चांगले सुरु आहे आता इखलास सय्यद ते कार्य पुढे नेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दत्तवाडी आकुर्डी येथे राष्ट्रवादी चे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी कष्टकरी कामगारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यावेळी अजित गव्हाणे बोलत होते

यावेळी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट ,कार्याध्यक्ष फजलभाई शेख,माजी नगरसेवक निलेश पांढरकर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, कामगार सेल चे अध्यख किरण देशमुख,पुष्पाताई शेळके,कविताताई खराडे,शकरूला पठाण,साहूल हमीद शेख, अशोक वायकर,मनीषा ताई गटकल, ज्योती ताई गोफने, आशा ताई मराठे,निर्मला ताई माने,आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी कविता ताई आल्हाट, विनायक रणसुभे, ज्ञानेश्वर ननावरे, आर.जी.जाधव,यशवंत भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत सोनार, गंगाधर चौधरी, विश्वनाथ मोरे,चंद्रकांत इंगळे,आण्णा भोसले,गौतम बेंद्रे, अनिल पाटील, शिवाजी मिसाळ, रमेश भोरकर,शाहरुख शेख, सुनील मोरे,भास्कर म्हस्के,जावेद पठाण, जिब्राईल शेख, नम्रता गुरव , ललिता माने , संगीता पारेख यांनी परिश्रम घेतले, प्रास्ताविक इखलास सय्यद यांनी केले आभार झाकीर रमजान शेख यांनी मानले तर सूत्र संचालन प्रकाश परदेशी यांनी केले