काटेवाडीत बूथप्रमुख म्हणून काम सुरू केले आहे – अजित पवार  

0
480

पुणे, दि. २ (पीसीबी) –  निवडणूक प्रक्रियेत सहभाग दिसून येण्यासाठी आधी तुम्ही स्वत: भाग घेतला पाहिजे. त्यानंतर  कार्यकर्ते आपोआप तुमच्यामागून कामाला लागतील. मी स्वत:  काटेवाडी या माझ्या गावचा बूथप्रमुख आहे, असे सांगून कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत मतदारांना आणण्यासाठी  पुढाकार घ्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी येथे केले. 

अजित पवार  पुण्यात निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीत  बोलत होते. वैयक्तिक कामे सर्वांनाच असतात. मात्र, पक्षासाठीही वेळ देणे गरजेचे आहे. आता प्रत्येकाने निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ द्यायला पाहिजे,  असे पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बजावले.

निवडणुकीची तयारी करताना आधी बूथ रचनेवर  काम करा. मी आतापासूनच काटेवाडी  गावात   बूथप्रमुख म्हणून पक्षाच्यावतीने काम सुरू केले आहे. आपआपल्या भागात अशी जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी.  तरच इतर कार्यकर्तेही आपोआपच कामाला लागतील, असे पवार म्हणाले.