पिंपरीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार फरार

0
506

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – आपल्या जाऊबाईसोबत जेवायला निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकामारून चोरुन नेले. ही घटना रविवारी (दि.३०) सायंकाळी सव्वाआठच्या सुमारास पिंपरीतील उज्जीवन फायनान्स कंपनीच्या ऑफीससमोरील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी विद्या शिनकर (वय ३८, रा. फ्लॅट नं. २०, वैभवनगर फेज-२, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार दुचाकीवरील दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सव्वाआठच्या सुमारास पिंपरीतील उज्जीवन फायनान्स कंपनीच्या ऑफीससमोरील रस्त्यावर विद्या या त्यांच्या जाऊबाईसोबत जेवायला निघाल्या होत्या. यावेळी मागून दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले. पिंपरी पोलीस आरोपी चोरांचा शोध घेत आहेत.