काँग्रेस विलास मुत्तेमवारांचे लोकसभेचे तिकीट कापणार ?  

0
725

नागपूर, दि. १५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नागपूरमधून  विलास मुत्तेमवार यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे समजते. प्राथमिक चाचपणीत सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या विलास मुत्तेमवार यांचा पत्ता कट  केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुत्तेमवार  यांच्याऐवजी बबनराव तायवाडे, प्रफुल गुडढे आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नावावर काँग्रेस विचार  करत आहे. तर  केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी भाजपमधून काँग्रसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या नावांची चर्चाही काँग्रेसने केलेली नाही.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील पक्षाची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे ‘नवा गडी, नवा राज्य’ या नियमानुसार राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेत काही बदलही केले आहेत. स्थानिक स्तरावर निरीक्षकांकडून होणारी चाचपणी आणि त्यातून पुढे येणारी नावे प्रामुख्याने चर्चेला घेतली जात आहेत. हा त्या बदलाचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.